★ Menu ★

Navratri Festival 2021 Calender Schedule

नमस्कार देवीभक्त,
कोरोना महामारीमुळे यंदाचा नवरात्र उत्सव 2021 चा श्री तुळजाभवानी मंदिरात भक्ताविना मात्र प्रतिवर्षी प्रमाणे विधी, परंपरेने युक्त असा साजरा होणार आहे. सदरील काळात तुम्ही ऑनलाईन दर्शन द्वारे घरी बसल्या देवीजींचे नित्य दर्शन घेऊ शकता. त्यासाठी खालील युट्युब चॅनेल ला भेट द्या
👉👉( Youtube Channel ) 👈👈
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रींचे नवरात्र दि.07/10/2021 ते 15/10/2021 या कालावधीत श्री क्षेत्र तुळजापूर येथे साजरे होत आहे. नवरात्री कालावधीत अर्पण केलेली सेवाविधी पुजा अधिक पुण्यप्रद व फलदायी असल्याने, ज्या भक्तांना नवरात्री उत्सवात श्रींस पुजा सेवा विधी अर्पण करायचे असल्यास वेबसाईटवर आपल्या सेवेची नोंदणी करावी.सदरील उत्सवाचा कृपाप्रसाद आपणांस पोस्ट / कुरिअर मार्फत उत्सव कालावधीनंतर पाठवण्यात येईल. बाकी श्रीकृपेने आपले क्षेमकुशल आम्ही इच्छितो.पूजेची नोंदणी करण्यासाठी खालील लिंक ला जाऊन नोंदणी करावी.
👉👉 ( Online Pooja Prasad Seva) 👈👈
Dear Devotee
We are happy to invite you that Navratri Festival is going to happen from 07th Oct, 2021 to 15th Oct 2021. We request your online presence on this very auspecious festival to get blessed from Lord Shri Tulja Bhavani mata as Due to Covid19, No devotee allowed in Temple . Those devotee, who want to offer Seva during navratri festival , they can avail our ePrasad facility by registering your offering at below website.Your navratri ePrasad will be delivered to your home after Pournima.
Visit Our Youtube Channel For Live Navratri Darshan -> 👉👉( Youtube Channel ) 👈👈
For ePooja Prasad Offering --> 👉👉 ( Online Pooja Prasad Seva ) 👈👈

तारीख कार्यक्रम
बुधवार, २९-०९-२०२१ सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा
गुरुवार, ०७-१०-२०२१ पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दु. १२ वा ब्रह्मवृन्दास अनुष्ठान वर्णी व रात्रौ छबिना मिरवणूक
शुक्रवार, ०८-१०-२०२१ श्री देवीजींची नित्योपचार पूजा व रात्रौ छबिना मिरवणूक
शनिवार, ०९-१०-२०२१ श्री देवीजींची रथ अलंकार महापूजा व रात्रौ छबिना
रविवार, १०-१०-२०२१ ललिता पंचमी, श्री देवीजींची मुरली अलंकार महापूजा व रात्रौ छबिना
सोमवार, ११-१०-२०२१ श्री देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा व रात्रौ छबिना
मंगळवार, १२-१०-२०२१ श्री देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना
बुधवार, १३-१०-२०२१ दुर्गाष्टमी , श्री देवीजींची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा. दु. ३ वा वैदिक होमास आरंभ , सायंकाळी ८ वाजता होमास पूर्णाहुती व रात्रौ छबिना
गुरुवार, १४-१०-२०२१ महानवमी, नित्योपचार पूजा दु. १२ वा होमवर धार्मिक विधी, घटोत्थापन, रात्रौ पलंग पालखीसोबत मिरवणूक
शुक्रवार, १५-१०-२०२१ विजयादशमी दसरा, शिबिकारोहण, श्रींच्या मंचकी श्रमनिद्रेस प्रारंभ व सार्वत्रिक सीमोल्लंघन
बुधवार, २०-१०-२०२१ मंदिर पौर्णिमा, पहाटे श्रींची सिंहासनावर पुनः प्रतिष्ठापना, सोलापूरच्या काठ्यासह जोगवा व छबिना


This post was published on 19-09-2021 at tuljabhavani.in and tagged under Navratri Festival 2021 Calender Schedule

All Post Previous Post (Terms and Conditions)