नमस्कार देवी भक्त,
कोरोना महामारीमुळे यंदाचा नवरात्र उत्सव २०२० चा श्री तुळजाभवानी मंदिरात भक्ताविना मात्र प्रतिवर्षी प्रमाणे विधी, परंपरेने युक्त असा साजरा होणार आहे. सदरील काळात तुम्ही ऑनलाईन दर्शन द्वारे घरी बसल्या देवीजींचे नित्य दर्शन घेऊ शकता. त्यासाठी खालील युट्युब चॅनेल ला भेट द्या
👉👉 ( http://youtube.com/tuljabhavani/live ) 👈👈
तसेच या काळात आपणांस देवीजींना पूजा विधी सेवा अर्पण करायची असेल तर ऑनलाईन पूजा- प्रसाद सेवा देखील उपलब्ध आहे. आपण सांगितलेल्या दिवशी विधिवत पूजा करून आपणांस पूजेचा कृपाप्रसाद पाठवण्यात येईल. पूजेची नोंदणी करण्यासाठी खालील लिंक ला जाऊन नोंदणी करावी.
👉👉 ( http://bit.ly/TuljaPrasad ) 👈👈
नवरात्र महोत्सवाची रूपरेषा खालील प्रमाणे
( शनिवार १७/१०/२०२० - नवरात्रारंभ ,नित्योपचार अलंकार महापूजा )
--
( रविवार १८/१०/२०२० - श्री देवीजींची नित्योपचार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना मिरवणूक )
--
( सोमवार १९/१०/२०२० - नित्योपचार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना मिरवणूक )
--
( मंगळवार २०/१०/२०२० - रथ अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )
--
( बुधवार २१/१०/२०२० - ललिता पंचमी, मुरली अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )
--
( गुरुवार २२/१०/२०२० - श्री देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )
--
( शुक्रवार २३/१०/२०२० - श्री देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )
--
( शनिवार २४/१०/२०२० - दुर्गाष्टमी , श्री देवीजींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )
--
( रविवार २५/१०/२०२० - महानवमी , नवरात्रौत्थापन, होमवर धार्मिक विधी, सायं. सामूहिक सीमोल्लंघन )
--
( सोमवार २६/१०/२०२० - विजयादशमी दसरा, उष:काली श्री देवीजींचे सीमोल्लंघन व मंचकी निद्रा )
--
( शुक्रवार ३०/१०/२०२० - कोजागिरी मंदिर पौर्णिमा व रात्रौ लक्ष्मी - इंद्रपूजन )
--
( शनिवार ३१/१०/२०२० - पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना व मंदिर पौर्णिमा व सोलापूरच्या काठ्यासह छबिना व जोगवा )
शुभं भवतु,
Tuljabhavani.In