★ Menu ★

Tula Bhavani Jewellery

 

 

जय भवानी

मराठवाड्याचा रूपाने तुळजापूरवर हैदराबादच्या निजामाचे 1724 ते 1948 असे सलग 224 वर्षे राज्य होते. तुळजापुरातील मठांना जवळपास चार हजार एकर जमीन दान दिलेली आहे. याशिवाय निजामाने लावलेल्या देवल ए कवायत कायद्याच्या व्यवस्थेनुसारच आजही तुळजाभवानी मंदिराचे धार्मिक कार्य चालते. निजामाच्या काळातही प्लेग सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले होते. कित्येकवेळा दुष्काळ आला. यावर मात करण्याकरिता निजामाने ठोस पावले उचलली. प्लेगवर कायमस्वरूपी लस निघावी म्हणून मोठी आर्थिक तरतूद केली. 1901 ला मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला असता मोठ्या प्रमाणात पैसे देऊन दुष्काळी कामे करून घेतली. त्याचेच फलित म्हणजे तुळजापूरचा घाट आणि रामदरा तलाव होय. निजाम कालखंडात तुळजाभवानीच्या पूजा व्यवस्थित कुठेही बाधा आली नाही. याउपर निजामाचा दिवाण राजा चंदुलाल ने सुरु केलेला दुपारचा नैवेद्य तसेच होम हवनाकरिता केलेली तरतूद आजही चालू आहे.

आई तुळजाभवानीला एक अनेक राजा महाराजांनी अर्पण केलेले दाग दागिने आहेत. त्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अर्पण केलेली मोहराची माळ ही आहे. 101 मोहरा व 103 मणी आणि ज्याचे वजन 1560 ग्रॅम 830 मी मी एवढे आहे. तोच धागा तीच वीण पाहिल्यानंतर शिवरायांच्या प्रति भाव जागृत होतात. छत्रपतींचा दागिना पाहणे हे भाग्यच. याशिवाय फ्रेंच, निजाम, शिंदे अशा विविध घराण्याने दिलेले अनमोल दागिने आहेत

 


This post was published on 16-05-2020 at tuljabhavani.in and tagged under Jewellery, अलंकार

All Post Previous Post (tuljapur vip darshan online booking)