उद्या दिनांक (२६/०४/२०२०)वार रविवार
सर्व देविभक्तांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा...
अशीच आई जगदंबेची कृपा सर्व भक्तांवर अक्षय्य राहो हीच श्रींचरणी प्रार्थना...🚩🚩
महत्व-
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे
टीप: ज्या भक्तांना अक्षय्य तृतीय्येनिमित्त पूजा सेवा अर्पण करायची असेल त्यांनी http://bit.ly/TuljaPooja या वेबसाईटला भेट द्यावी.आपली पूजा सेवा अर्पण करून आपणांस प्रसाद पाठविला जाईल.